रस्ते खराब, चूक कबूल करत मंत्र्याने हाताने धुतले तरुणाचे पाय; होतोय भरपूर चर्चा
खेडेगावांपासून ते शहरांपर्यंत खराब रस्ते पाहायला मिळणे काही नवे नाही. परंतु रस्ता खराब आहे म्हणून कोणत्या मंत्र्याने सामान्य नागरिकाची माफी मागणे, तसेच त्याचे पाय धुवून देणे, हे फार क्वचितच ऐकायला मिळते. मध्यप्रदेशचे उर्जामंत्री प्रदुमन सिंह तोमर (Pradhuman Singh Tomar) यांनी प्रत्यक्षात अशी कृती केली आहे, ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
प्रदुमन सिंह तोमर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये हे मंत्री हे एका तरुणाचे चिखलाने भरलेले पाय धुताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Pradhuman Singh Tomar Viral Video) होत आहे.
मध्यप्रदेश सरकारमध्ये उर्जामंत्री असलेले तोमर हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात रस्त्याची पहाणी करण्यासाठी पोहचतात. यावेळी जेव्हा ते ग्वालियर मधील मेंटल हॉस्पिटलजवळच्या रस्त्याची पाहाण्याकरण्यासाठी पोहचले तेव्हा नागरीकांनी रस्त्यांच्या स्थितीबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली. रस्ते कायम चिखलमय असल्याची तक्रार मंत्र्यांकडं केली.
यावेळी जवळून एक तरूण जात होता. त्या तरुणाचे पाय चिखलाने भरलेले होते. त्याला पाहून मंत्र्यांनी हात जोडून त्याची माफी मागीतली आणि मी तुमच्यामुळेच आहे असेही सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी पाणी मागवले आणि स्वतः च्या हाताने त्या तरुणाचे चिखलाने माखलेले पाय धुतले. यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून खडे बोल सुनावले.
Madhya Pradesh Min Pradhuman Singh washed the feet of a person as the minister apologised for the bad condition of road in Gwalior
I apologised to people for the bad condition of the road & promised to repair the road which was dug for a sewer line work, said the minister (16.1) pic.twitter.com/nK8MzZBBto
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 17, 2023