ठाकरे सरकारला धक्का, आणखी एका मंत्र्याची ईडीकडून चौकशी

मुंबई – महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची इडीकडून तब्बल सात तास चौकशी झाली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणात ही चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे, त्यामुळे ही चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे.

प्राजक्त तनपुरे यांना ईडीने समन्स बजावला होता. मंगळवारी तनपुरे यांना दुपारी एक वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. पण ईडीच्या मीटिंगमुळे दुपारी तीन वाजता चौकशी सुरू झाली.  राज्य सहकारी बँक संदर्भात चौकशी झाली.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केलीय. प्राजक्त तनपुरे यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली याविषयी बोलताना किरीट सोमय्यांनी प्राजक्त तनपुरे हे अनिल देशुख यांच्या वाटेवर असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे.

ठाकरे सरकारचे मंत्र्यांचे, नेत्यांचे अनेक घोटाळाचे उद्योग बाहेर येत आहेत. यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.