बीड | भाजपला सफाई कामगारांविषयी कुठलीही सहानुभूती नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. विशेषत: त्या लोकांची जे हाताने मैला साफ करण्याच्या भयानक आणि अमानुष प्रथेत गुंतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेत धोरणात्मक सुधारणांमध्ये लक्ष देण्याची गरज आहे, ती धोरणांमधून काढून टाकण्याची नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातून हे काढून टाकणे म्हणजे, हाताने कचरा, मैला साफ करणाऱ्यांच्या प्रथेला स्वीकार न करणे आणि त्यांना सुरक्षा न देण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी (आणि बहुधा शेवटचा) हा एक निर्णय आहे.
Outrageous!
The BJP has NO empathy for the Safai Karamcharis, especially those engaged in the appalling and inhuman practice of manual scavenging.
The practice of manual scavenging needs to be addressed in policy reform, and not erasing it from policies.
This erasure from the… https://t.co/8JpO6Vjctx
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 30, 2024
सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठीचा हा लढा थांबता कामा नये; हा लढा चालूच राहायला पाहिजे, सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आणि लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप