Prakash Ambedkar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांच्यावर भरपूर टीका केली होती. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर म्हणाले, प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला कुठेतरी असं जाणवू लागलं आहे की नजिकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील. सध्या तसं चित्र दिसू लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आलं आहे. म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. राज ठाकरे हे त्या शिवसेनेचे प्रमुख होतील. मला तशी शक्यता दिसत आहे. मला स्वतःलाही त्याबद्दल थोडी उत्सुकता आहे.” असे त्यांनी म्हटले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप