Prakash Ambedkar | एससी, एसटी यांचे आरक्षण हे संविधानिक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला संविधानिक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजप यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोहोळ येथील आरक्षण बचाव यात्रेच्या सभेदरम्यान केले.
ओबीसी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहून ओबीसींसाठी लढा द्यावा. तुम्ही आमच्यातच यावं अशी आमची मागणी नाही. पण तुम्ही ओबीसींना उमेदवारी मागितली पाहिजे.
धनगर, माळी किंवा अन्य ओबीसी समाजाचा मेळावा असेल तर लाखांनी लोक जमतात पण ओबीसींच्या नावाखाली 100 लोक सुद्धा जमत नाहीत. आता ओबीसींना राजकीय ओळख दाखवली पाहिजे. 7 तारखेच्या औरंगाबाद येथील सभेचा उद्देश एकच आहे की, यातून ओबीसींचा राजकीय चेहरा आपल्याला उभा करायचा आहे ते केले तरचं आपलं आरक्षण वाचणार असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
राज्यात एक नौटंकी सुरू आहे. ती म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असे नाटक दाखवले जात असल्याची टीकाही ॲड. आंबेडकर यांनी केली.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, ओबीसी नेते अविनाश भोसीकर, ओबीसी नेते रमेश बारस्कर यांच्यासह विविध ओबीसींच्या संघटना आणि त्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar : आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका, शरद पवारांची स्पष्टोक्ती
Piyush Goyal : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी, पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
Prakash Ambedkar : राजकीय चेहरा दाखवू तरच आपण आरक्षण टिकवू; ॲड. प्रकाश आंबेडकर