Prakash Ambedkar | नामानंद महाराज संस्था, ता.जि. लातूर येथे परमभागवत ब्रह्मश्री श्री वेदनंद महाराज समाधी या ठिकाणी विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांनी आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत केले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैपासून मुंबई, चैत्यभूमी येथून सुरू झाली. आरक्षण बचाव यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. यात्रा लातूर येथे मुक्कामी होती. आज यात्रा ज्यावेळी मार्गस्थ झाली तेव्हा विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. पंकजा मुंडे यांना ॲड. आंबेडकर यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले होते.
यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ओबीसी नेते रमेश बारस्कर, ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Prakash Ambedkar | ‘मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे’