Prakash Ambedkar | BMC च्या प्रत्येक अधिकाऱ्यावर शक्य तितक्या कठोर कारवाई करण्यात यावी, वंचितची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रमाबाई नगर घाटकोपर येथे काल झालेल्या होर्डिंग दुर्घटनेला भेट दिली. यावेळी वंचित चे ईशान्य मुंबई लोकसभा उमेदवार दौलत खान, युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी पीडित कुटुंबियांच्या कुटुंबांशी संवेदना व्यक्त केली. तसेच या प्रकरणी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, भाजप- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने वर्षानुवर्षे बीएमसीला लुटले आहे आणि त्यात भ्रष्टाचार केला आहे.

वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की, BMC च्या प्रत्येक अधिकाऱ्यावर शक्य तितक्या कठोर कारवाई करण्यात यावी ज्याने बेकायदेशीर होर्डिंगला इतके दिवस उभे राहू दिले त्यांना गजाआड करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबाला 20 लाख रुपये आणि 10 लाख रुपये मदत म्हणून तातडीने जाहीर करावी.अशी मागणी ही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप