Prakash Ambedkar | उज्ज्वल निकम यांनी कोणाचा दबाव होता ते स्पष्ट करावे 

Prakash Ambedkar | उज्ज्वल निकम यांनी कोणाचा दबाव होता ते स्पष्ट करावे 

Prakash Ambedkar | उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल. आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का ? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीड करू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, जसे परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे, तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हटले आहे की, या देशात जयचंद किती निर्माण झाले आणि या भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावं लागलं त्याची उदाहरणे त्यांनी दिले आहेत. मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतोय की, २६/११ मध्ये काय घडलं आहे ? हे लोकांना प्रामाणिकपणे सांगावे. आपण सांगितलेली व्यक्ती आणि संघटना या देशात जयचंदचे काम करणार का याबद्दल जनता निर्णय घेईल.

२६/११ हल्ला झाला. त्या हल्ल्यामागील एक हल्ला आहे. ज्याने कोणी हल्ला केला त्याला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. याचा अर्थ त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो संबंध भाजप का उलगडत नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी भाजपला विचारला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Contemporary wind - group show of paintings at Raja Ravi Varma art gallery

Contemporary wind – group show of paintings at Raja Ravi Varma art gallery

Next Post
Vasant More | मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील, उमेदवार २५ हजारांच्या लिडने निवडून येईल

Vasant More | मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील, उमेदवार २५ हजारांच्या लिडने निवडून येईल

Related Posts
सोमय्या

‘राज्यातील जनतेच्या हितासाठी ध्येयवेडा व्हावे लागले तर होईल मी ध्येयवेडा’

मुंबई – किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी सोमय्या कोर्लईला जाणार…
Read More
Raj Thackeray | राज ठाकरे अमित शाह यांची भेट घेणार, मनसेच्या महायुतीत सहभागी होण्यावर चर्चा होणार

Raj Thackeray | राज ठाकरे अमित शाह यांची भेट घेणार, मनसेच्या महायुतीत सहभागी होण्यावर चर्चा होणार

Raj Thackeray | लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी राज्यात आणखी एका पक्षाची युती पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना…
Read More
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन आणि...; 'या' सेलिब्रिटींना अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकासाठी निमंत्रण 

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन आणि…; ‘या’ सेलिब्रिटींना अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकासाठी निमंत्रण 

Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या मंदिराचा अभिषेक सोहळा पुढील वर्षी 22 जानेवारी…
Read More