‘योगी आणि महाराजांची जागा मठात, ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशाचं वाटोळं झालं आहे’

सोलापूर – पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये भाजपने (BJP) घवघवीत यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेत भाजपवर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास टाकला. तर, पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. दरम्यान, पराभव पचवता येत नसल्याने आता काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

योगी आणि महाराजांची जागा मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी टीका केली आहे. योगी आणि महाराजांची (Yogi and Maharaj)जागा मठात असून ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशाचं वाटोळं झालं, असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले. वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी,’ अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.आगामी महापालिका (Municipal Corporation), जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये (election) निश्‍चितपणे कॉंग्रेसला मोठे यश येणार आहे.

महापालिकेवर कॉंग्रेसचाच (Congress) झेंडा फडकणार आहे. सर्वसामान्य जनता हीच कॉंग्रेसची ताकद आहे. कॉंग्रेसच्या काळामध्ये गॅस सिलिंडरची (Gas cylinder) किंमत ३५० रुपये होती, पण आता १ हजारांवर तो येऊन पोहचला आहे. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मते मागत आहेत. असं देखील त्या म्हणाल्या.