‘कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत लव्ह-जिहाद करणाऱ्या ठाकरेंनी आता राजीनामा देऊन नैतिकता सिद्ध करावी’

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात युती सरकारच्या बाजूने निकाल दिला, खरंतर हा निकाल अपेक्षितच होता. हे सरकार सत्तेत आल्यापासून काही टोमणेबहाद्दर, या सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार म्हणून हिणवत होते. मात्र आज घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कोर्टाने चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण अलई (Pravin Alai) यांनी दिली आहे.

पुढे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला मारताना प्रवीण अलई म्हणाले, टोमणे मारण्यात पटाईत असणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आता नैतिकतेच्या आधारावर राजीनामे मागत फिरत आहेत. मात्र त्यांना खरच राजीनामा मागण्याचा तरी अधिकार आहे का?. हा आमचा सवाल आहे. हिंदू मतांचा अनादर करत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत लव्ह-जिहाद करणाऱ्या ठाकरेंनी आता नैतिकतेच्या बाता न मारता, विधान परिषदेचा राजीनामा देऊन आपली नैतिकता सिद्ध करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.