मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी (ST Strike) कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानातील आंदोलनातुम भाजपनेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली असली तरी भाजपचा एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठींबा आहे.
यासाठीच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नंदूरबार आगारात जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. राज्यातील एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकातील आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी कामगारांची भूमिका समजून घेतली. सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांनी किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासनाने दडपशाहीने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये, शरद पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, आम्ही सरकारचे अभिनंदन करु, असं दरेकर म्हणाले.
मी सरकारसोबत चर्चा करायला तयार आहे. एसटीचं विलीनीकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो. सरकार पत्रकार परिषदमध्ये काय बोललं हा निर्णय नाही. पगारवाढीसह ज्या घोषणा केल्या त्याचा अद्यापही लेखी शासन निर्णय जाहीर झाला नाही. कोर्टाने विलीनीकरण करु नका असे सांगितलेले नाही. समितीचे सारे सदस्य सरकारचेच आहेत, असंही दरेकरांनी सांगितलं.
https://www.youtube.com/watch?v=VVnoT-1TjY8&t=1s