मावळचे राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार हे पूर्वीचे भाजपाचे उपनगराध्यक्ष, दरेकरांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : मावळच्या निष्पाप शेतक-यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे सरकार सत्तेवर होते व तेव्हा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार होते. त्यावेळी शेतक-यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पण आता आपली जबाबदारी झटकून त्या गोळीबाराच्या घटनेसाठी पोलिसांना जबाबादार धऱले जात आहे व त्या घटनेचे खापर पोलिसांवर फोडण्याचा सध्याच्या सत्ताधा-यांचा प्रयत्न दुदैर्वी व केविलवाणा असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

तसेच पवार यांच्या मुद्दयाला प्रत्युत्तर देताना दरेकर यांनी स्पष्ट केले की जो राष्ट्रवादीचे जे उमेदवार मावळ निवडणुकीत निवडून आले तो उमेदवार आधी भाजापचे उपनगराध्यक्ष होते. तसेच लोकसभा निवडणुकीत त्याच मावळमध्ये पार्थ पवार यांना ४१ हजार मतांची पिछाडी होती याचे स्मरणही दरेकर यांनी यावेळी करुन दिले.

शरद पवार यांनी आजच्या आपल्या पत्रकार परिषदेत केलेल्या विविध मुद्दयांना प्रत्युत्तर दिले. याप्रसंगी भाजापाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सुनिल कर्जतकर उपस्थित होते. दरेकर यांनी सांगितले की, मावळची घटना भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहित केल्यामुळे झाल्याचा आरोप पवार यांनी केला. परंतु ही घटना ज्यावेळी घडली, त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. त्या पाईपलाईनचा आग्रह ते धरत होते, पण शेतकरी त्याला विरोध करत होते.

परंतु शेतक-यांच्या बाजू एकून न घेता तो प्रकल्प राबविण्याचा अट्टाहास त्यावेळी त्यांच्या सरकारमध्ये केला जात होता. भाजाने स्थानिकांना प्रोत्साहित केले नाही तर शेतक-यांच्या अंसतोषाला वाचा फोडण्याचे काम भाजपाने केले होते. पण ते आंदोलन चिरडून टाकण्याचा निर्णय तत्कालिन सरकारने घेतला होता. त्या वेळेला बेछूट गोळीबार झाला. त्या गोळीबाराची आठवण त्यांना झाली नाही आणि लखीमपूरचे राजकारण करण्यात आले. गोवारींचे हत्याकांडही या राज्यात झाले. त्या वेळेला सरकार कोणाचे होते, त्या वेळेला भावना काय व्यक्त केल्या गेल्या. आता मावळचे खापर पोलिसांवर फोडले जात आहे. सत्ताधाऱ्यानी त्या वेळेला केलेल्या अत्याचार, गोळीबाराचे खापर पोलिसांवर फोडण्याचे दुर्दैवी आणि केविलवाणे काम सत्ताधारी पक्षाकडून असल्याची जोरदार टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

मावळच्या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मावळमध्ये विजय झाल्याचा उल्लेख पवार यांनी केला. परंतु विजय-पराजय हे त्या ठिकाणच्या मूल्यमापन करण्याच्या गोष्टी नसतात. परंतु राष्ट्रवादीत विजयी झालेले उमेदवार भाजपचे उपनगराध्यक्ष होते. पवारसाहेबांच्या घरचा उमेदवार पार्थ पवार लोकसभेला निवडणुक लढवित असताना ते मावळमध्ये ४१ हजार मतांच्या पिछाडीवर हाते. त्याच मावळमध्ये राष्ट्रवादीच्या जागा किती? भाजपच्या जागा किती? याचेही मूल्यमापन दुर्दैवाने सोयीनुसार करण्यात आलेले नाही.याचे स्मरणही दरेकर यांनी यावेळी करुन दिले.

हे देखील पहा