काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले अभिजीत पवार ( Abhijit Pawar) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. हा जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र आता पक्षप्रवेशाच्या अवघ्या दोन दिवसांतच अभिजीत पवारांनी यू टर्न घेतला आहे. या पक्षप्रवेशानंतर अभिजीत पवार यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या पक्ष प्रवेशासाठी प्रचंड दबाब टाकण्यात आला होता, असा आरोप केला. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर आत्महत्या केली असती अशी धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत अभिजीत पवार (Abhijit Pawar) म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठवण्याचे प्लॅनिंग होते. माझ्या मित्रांना पोलिसांकरवी धमक्या दिल्या. ईडीची धमकी दिली जात होती, त्यामुळे अस्वस्थ झालो होतो. नजीब मुल्ला मला फोन लावून देऊन इतरांकरवी धमक्या देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळेच मी आव्हाड यांना न सांगता केवळ दबावापोटी अजित पवार गटात गेलो होतो. परंतु, माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकविण्यासाठी केला जाणार, हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाडांकडे आलो. माझ्या आईला आणि पत्नीला घाबरवण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
अभिजीत पवार म्हणाले, आता जितेंद्र आव्हाड यांनी मला आपलेसं केलं नाही तरीसुद्धा मी आव्हाडांना सोडणार नाही, असंही ते म्हणालेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता
अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन – Dhananjay Munde