अभिमानास्पद : राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान; महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव

नवी दिल्ली : तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.

परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक

महाराष्ट्राचे सुपूत्र एअर मार्शल प्रदीप बापट यांना परम विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख ,एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस आणि एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नैतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवाद्यांना परतवून लावले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी ‘असे’ असेल पाणी पाळ्याचे नियोजन

Next Post

लग्न मंडपातच ‘या’ अभिनेत्याने पत्नीचे घेतले चुंबन; सोशल मीडियावर तो व्हिडिओ झाला वायरल

Related Posts
केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

मुंबई – केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू…
Read More
बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र विधानसभेची तारिख जाहीर, 20 नोव्हेंबरला पार पडणार मतदान

बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र विधानसभेची तारिख जाहीर, 20 नोव्हेंबरला पार पडणार मतदान | Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra Assembly Election 2024 : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एका टप्प्यात…
Read More

शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या घरापुढे आंदोलन करणार – ॲड यशोमती ठाकूर

अमरावती : गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ…
Read More