पृथ्वी शॉने भर रस्त्यात मुलीला दांडक्याने मारले? Video होतोय तुफान व्हायरल

मुंबई- भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलबाहेर पृथ्वी शॉची कार समजून त्याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बुधवारी (१५ फेब्रुवारी) ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या गाडीवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा पाठलाग करून पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल (Prithvi Shaw Selfie Controversy) करण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच पृथ्वी शॉचा भर रस्त्यात एका महिलेला धक्काबुक्की देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ आणि त्या तरुणी मध्ये (Prithvi Shaw Fight With Girl) बाचाबाची झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

व्हिडिओ बनवताना पाहून पृथ्वी शॉने कॅमेराला धक्का दिला. याशिवाय समोर आलेल्या इतर व्हिडिओंमध्येही पोलिस घटनास्थळी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वी शॉ रस्त्यावर फोन हलवताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या प्रकरणातील मुलीच्या वकीलांनी पृथ्वी शॉवर आरोप केला आहे की त्यांने या मुलीला दांडक्यानं मारले आहे.