Priyanka Gandhi | आदिवासींना जल, जंगल, जमीनचा अधिकार व पेसा कायदा काँग्रेस सरकारने दिला

Priyanka Gandhi | आदिवासींना जल, जंगल, जमीनचा अधिकार व पेसा कायदा काँग्रेस सरकारने दिला

Priyanka Gandhi | आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनचा अधिकार दिला. काँग्रेस सरकारने पेसा कायदा आणला तर राजीव गांधी यांनी पंचायत राज कायदा आणून अधिकार दिले. परंतु भाजपाची विचारधारा याच्या उलट आहे. भाजपा आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, तर देशभरातील २२ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, हा आदिवासींचा सन्मान आहे का, असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी विचारला आहे.

इंडिया आघाडीचे नंदूरबार मतदारसंघातील उमेदवार ॲड. गोवाल पाडवींच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, नंदूरबारच्या कालच्या सभेत पंतप्रधानांनी मी शबरीचा पुजारी आहे असा उल्लेख केला पण कुठे श्रीराम ज्यांनी शबरीचा सन्मान केला तर शेकडो शबरींचा अपमान होत असताना गप्प बसणारे नरेंद्र मोदी कुठे ?…हाथरस, उन्नावमध्ये महिलेवर अत्याचार झाला तेव्हाही मोदी गप्प बसले. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, महिला खेळाडू न्याय मागत होत्या त्यावेळी मोदी कुठे होते? कुठे भगवान श्री राम व शबरीमाता आणि कुठे नरेंद्र मोदी. उन्नावच्या आपल्या बहिणीवर तसेच या देशातील अनेक महिलांवर महिलांवर अत्याचार होत असताना मोदींनी त्यांना मदत केली नाही, त्याकडे बघितलेही नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केला त्यांच्या मुलांना भाजपाने उमेदवारी दिली.

नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात जनतेसाठी काय केले ते सांगावे, शेतकरी संकटात आहे, शेती करणे अवघड झाले आहे. आदिवासी, गरिब जनता त्रस्त आहे त्याबद्दल काही बोलावे. मोदींनी परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख देतो म्हणाले, दरवर्षी २ कोटी रोजगार देतो म्हणाले पण त्यांनी हे काम केले नाही. मोदींचे राजकारण फक्त सत्तेसाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी नाही असा ह्ल्लाबोल करत लोकसभेच्या निवडणुकीत विचार करून मतदान करा असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले आहे.

या सभेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री के, सी, पाडवी, आ. शिरिष नाईक, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा आरोप खोटा? पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा आरोप खोटा? पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

Next Post
Ramdas Athawale | यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मैदानात

Ramdas Athawale | यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मैदानात

Related Posts

कंगना राणौत अयोध्येत पोहोचली, रामलल्लाच्या दर्शनासाठी उत्सुक; म्हणाली, ‘हे आमचे भाग्य आहे’

Kangana Ranaut:- बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अयोध्येला पोहोचली आहे. ही अभिनेत्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे…
Read More
tejasvi surya

जिंकणारा उमेदवार हा फक्त जोशुआच असल्याने त्यालाच मत द्या – तेजस्वी सूर्या

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस…
Read More
Badlapur Crime Case | बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची झाली होती 3 लग्नं, तिनही बायका गेल्या सोडून

Badlapur Crime Case | बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची झाली होती 3 लग्नं, तिनही बायका गेल्या सोडून

बदलापूर प्रकरणात (Badlapur Crime Case) आरोपी अक्षय शिंदे याला पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील एका नामांकित शाळेतील दोन…
Read More