अवकाळी पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करा – पाटील

अवकाळी पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करा - पाटील

करमाळा  – करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कडे केली आहे.

राज्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका करमाळा तालूक्यासह माढा तालुक्यातील 36 गावांनाही बसल्याने आज माजी आमदार नारायण पाटील यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी असे साकडे घातले तर जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून महसुल खात्याकडून पिकनुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यातील शेतकरी वीज संकटातून स्वतःला सावरत असताना आता आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्याने पहात आहे.  शेतकऱ्यांना आता शासनाकडून आर्थिक मदतीची गरज असुन यासाठी महसुल तसेच कृषीविभागाने योग्य ती कार्यवाही सुरु केली पाहिजे अशी मागणी आपण केली आहे.

रब्बी पिकांवर या पावसाचा परिणाम झाला असून ज्वारी, गहु, मका, तुर यासह कांदा या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ जिरायत अथवा रब्बी पिकधारकांनांच बसला असे नसुन करमाळा तालुक्यातील ऊस व केळी उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. ऊसतोडणी चालू असल्याने तोडलेला ऊस पावसाच्या पाण्यामुळे शेतातील सरीत अडकुन बसला आहे. ऊस वाहतुक करुन कारखान्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता त्याला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. तर केळी या पिकावरही फार मोठे संकट आले आहे.

आशिया खंडातील चांगल्या दर्जेदार केळीचा पट्टा म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या करमाळा तालूक्यातील या भागात आता अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे केळीचे भाव गडाडले असुन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करुन महसुल व कृषीविभागाने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे तयार करावेत. या नुकसानभरपाई बाबतचा अहवाल तातडीने वरीष्ठ कार्यालयास पाठवावा तरच आगामी काळात पिकनुकसानभरपाईस शेतकरी पात्र ठरतील. या नुकसानभरपाई साठी आपण पाठपुरावा करत असुन संकटकाळी शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले

Previous Post
परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार; पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश 

परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार; पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश 

Next Post
गेंड्याच्या कातडीचे ‘गेंडा स्वामी', MVA सरकारमध्ये असल्यामुळे राज्याचं वाटोळं होतंय…!

गेंड्याच्या कातडीचे ‘गेंडा स्वामी’, MVA सरकारमध्ये असल्यामुळे राज्याचं वाटोळं होतंय…!

Related Posts
'राष्ट्रवादी हा समाजातील वेगवेगळ्या घटकांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष'

‘राष्ट्रवादी हा समाजातील वेगवेगळ्या घटकांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष’

मुंबई   – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रयत्न करणारा, त्यांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत…
Read More
ऍडलेड कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाला हरवणं अघड असल्याचं पुन्हा झालं सिद्ध!

ऍडलेड कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाला हरवणं अघड असल्याचं पुन्हा झालं सिद्ध!

IND VS AUS | ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारताचा पराभव केला. यजमान संघाला…
Read More
Balasaheb Thorat

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात तात्काळ वाढ करा!: बाळासाहेब थोरात

मुंबई : अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी दुर्गम ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करत आहेत. कोरोना काळात…
Read More