पुणे : राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात भटक्या विमुक्तांचं पदोन्नती आरक्षण असैवंधानिक असल्याचा प्रतिञापञ सादर केल्याने भटके विमुक्त कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सचिव समितीने सादर केलेलं हे प्रतिञापञ भटक्या विमुक्त्यांच्या पदोन्नती आरक्षणावर गदा आणणारे असल्याने सरकार हा तात्काळ या भूमिकेचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी वडकुते आणि व्हीजेएनटी कर्मचारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष खरमाटे यांनी दिला आहे.
मुळात सुप्रीम कोर्टाने व्हीजेएनटी माहिती मागितलेली नसताना सरकारने आमच्या पदोन्नती आरक्षण हक्कांवर गदा कृती का केली ? यामागे नेमकं कोण षडयंत्र रचतंय, याचाही मुख्यमंञ्यांनी शोध घ्यावा, आणि झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करावी, अशी व्हीजेएनटी कर्मचारी समन्वय समितिने केली आहे.
यामध्ये जे दोषी आहेत त्यांची चौकशी व्हावी पदोन्नती बाबत भटक्या-विमुक्तांना डावलण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप खरमाटे यांनी केला आहे. त्याचबरोबर येत्या सोमवारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयवर ओबीसी व्हीजेएनटी कर्मचारी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येतील असे खरमाटे यांनी सांगितलं.
हे पहा:
https://www.youtube.com/watch?v=DBZ9rSr33XU