‘सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज’

पुणे : ‘काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजींनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

तर, मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.’ असा घणाघात देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

हे देखील पहा