Pune Accident | उद्योगपतीच्या मुलाने मध्यरात्री पबबाहेर तरुण – तरुणीला चिरडले, पतित पावन संघटनेने प्रशासनावर उपस्थित केले सवाल

Pune Accident | शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या अपघातात एका तरुण आणि तरुणीला आपला जीव गमवावा लागला. आर.ब्रह्मा सन सिटीच्या मालकाचा मुलगा वेदांत अग्रवाल पोर्श कार चालवत असताना त्याने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. कल्याणी नगरमध्ये पहाटे 3:15 च्या सुमारास हा अपघात झाला, तरुण आणि त्याच्या मैत्रिणी एका पार्टीनंतर बल्लर पबमधून बाहेर पडत होत्या. यावेळी त्याने भरधाव वेगात दुचाकीसह काही वाहनांना धडक दिली. यात पबमधून बाहेर पडलेल्या तरुण तरुणीला चिरडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी या अपघातानंतर (Pune Accident) वेदांतला मारहाण केली.

या भीषण अपघातानंतर पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, अपरात्री मद्यधुंद अवस्थेत भरघोस वेगाने धावणाऱ्या मोटर खाली दोघांचा मृत्यू ब्रह्मा रिअल्टी अँड इंफास्ट्रक्चर या बांधकाम व्यवसायिकाच्या सुपुत्राने (वेदांत अग्रवाल याने) केलेला उद्योग याला जबाबदार नक्की कोण? पोलीस प्रशासन? कि, बेकायदेशीर रित्या रात्रभर पब चालवणारे हॉटेल व्यवसायिक? किंवा रस्त्यावर फिरणारे नागरिक?

पतित पावन संघटनेने रात्री चालणारे बंद करा असे निवेदन वेळोवेळी पोलीस कार्यालयात दिले असून तरीही पब चालकांवर एवढी मेहरबानी का? पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर कित्येक पब रात्रभर उशिरापर्यंत चालू असतात, अठरा वर्षाच्या वयोगटाच्या खालील कित्येक युवक युवती बिनधास्तपणे मद्यधुंद होऊन अर्धनग्न अवस्थेत पहाटे पबमधून बाहेर पडतात आणि असे गुन्हे घडतात, याला जबाबदार नक्की कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.

एका बाजूला पुणेकरांवर हेल्मेट सक्ती राबवली जाते आणि दुसऱ्या बाजूला अवैद्यरित्या रात्रभर पब चालवले जातात आणि यातूनच गुन्हेगारीला वाव मिळतो या सगळ्याला जबाबदार कोण?
निरअपराध लोकांचे जीव जाऊनही पब संस्कृती पुण्यात चालू राहणार का?
हे रात्रभर चालणारे पब आणखी किती जीव घेणार? सुसंकृत शहरातून पुणे शहर पोलीस ही पुण्यातली घाण बाजूला टाकणार का? त्या गुन्हेगाराला अन्य गुन्हेगारांसारखी वागणूक मिळणार कि अतिविशेष व्यक्तींसारखा पाहुणचार करणार?, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप