Pune Accident | पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, पबबाहेर तरुण-तरुणीला आलिशान कारने चिरडले, जागीच मृत्यू

Pune Accident | शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या अपघातात एका तरुण आणि तरुणीला आपला जीव गमवावा लागला. आर.ब्रह्मा सन सिटीच्या मालकाचा मुलगा वेदांत अग्रवाल पोर्श कार चालवत असताना त्याने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. कल्याणी नगरमध्ये पहाटे 3:15 च्या सुमारास हा अपघात झाला, तरुण आणि त्याच्या मैत्रिणी एका पार्टीनंतर बल्लर पबमधून बाहेर पडत होत्या. यावेळी हा अपघात (Pune Accident) घडला. धक्कादायक फुटेजमध्ये अपघातानंतरची घटना कैद झाली असून त्यात तरुणी रस्त्यावर पडलेली दिसत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वेदांत अग्रवाल हा त्याच्या पोर्शे कारने जात होता. त्याने भरधाव वेगात दुचाकीसह काही वाहनांना धडक दिली. यात पबमधून बाहेर पडलेल्या तरुण तरुणीला चिरडले. दोघेही रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी या अपघातानंतर वेदांतला मारहाण केली. अपघातानंतर मृतदेह घटनास्थळीच पडून राहिले होते. कारचालक अल्पवयीन मुलगा चालवत होता. १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शहरातील काही पब रात्री उशिरापर्यंत सुरु होते. कल्याणीनगर मधील एका पब मधून हे तरुण तरूणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले. तेव्हा 3.15 च्या सुमारास कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला. मयत तरूण तरुणी अपघातानंतर रस्त्यावरच पडून असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. आरोपी वेदांत अग्रवाल हा पुण्यातील प्रसिध्द ब्रम्हा बिल्डर्सचा मुलगा असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप