पुणे ठरणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर !

पुणे : सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हाही अत्यंत महत्त्वाचा घटक असून पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालिका लवकरच पादचारी दिन साजरा करणार असून त्याची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

पुणे शहर पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर असणार आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं सुजित पटवर्धन, हर्षद अभ्यंकर, प्रांजली देशपांडे,सूरज जयपूरकर,अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह पथ विभाग, मेट्रो, वाहतूक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित घटकांकडून पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, याबद्दल मते जाणून घेतली. शिवाय शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली. केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा आपला मानस असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

हे ही पहा: