Pune Heavy Rain | पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात

Pune Heavy Rain | पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात

पुणे | पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे ( Pune Heavy Rain), भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली.

पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आहे. या तुकडीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे. ही तुकडी, बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर्स (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक बचावसाधनांनी सुसज्ज आहे.

ही लष्करी तुकडी येऊन दाखल झाल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासोबत प्राथमिक पाहणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा वाढीव विसर्ग सुरु केल्याने एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

नागरी प्रशासनाच्या सहकार्याने, भारतीय लष्कराच्या या तुकडीने जलमय ( Pune Heavy Rain) भागातील सर्व इमारती आणि घरे रिकामी करण्यास सुरुवात केली असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. पूरग्रस्त भागाचा परिणामकारक आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी क्वाडकॉप्टर आणि फुगवता येण्याजोग्या रबरी नौकांच्या सहाय्याने टेहळणी करण्यात येत आहे.

सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, द्वारका अपार्टमेंटमधून, काही अडकलेल्या लोकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या निवासी इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमन व्यवस्था देखील तैनात केली गेली आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी अतिरिक्त राखीव मदत तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Jyoti Waghmare | वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांची खरमरीत टीका

Jyoti Waghmare | वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांची खरमरीत टीका

Next Post
Eknath Shinde | अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Eknath Shinde | अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Related Posts
shaktikanta Das

भारतीय रुपया इतर देशांच्या चलनापेक्षा चांगल्या स्थितीत – शक्तीकांत दास

नवी दिल्ली-  भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी गंभीर आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत…
Read More
शिवसेना

स्वबळावर शिवसेनेचा भगवा फडकु दे;  शिवसैनिक, युवा सैनिकांचे कमलाभवानी मातेला साकडे 

करमाळा –  महाराष्ट्राच्या विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकवून शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होवुदे यासाठी करमाळा तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक यांनी…
Read More
Cameron Bancroft Accident | ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटूचा मोठा अपघात, झाली गंभीर दुखापत

Cameron Bancroft Accident | ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटूचा मोठा अपघात, झाली गंभीर दुखापत

Cameron Bancroft Accident | ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट बाईक अपघाताचा बळी ठरला आहे. या अपघातात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट गंभीर…
Read More