Pune Loksabha Election | मतदानाची टक्केवारी वाढल्याने मुरलीधर मोहोळांना होणार फायदा?

Pune Loksabha Election | मतदानाची टक्केवारी वाढल्याने मुरलीधर मोहोळांना होणार फायदा?

पुणे(प्रतिनिधी) | पुणे लोकसभा (Pune Loksabha Election) मतदार संघामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान पार पाडले. पुण्यामध्ये 51 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार एकूण 53.54 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का सुमारे चार टक्यांनी वाढला आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नक्की कोणाला होणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभानिहाय झालेले मतदानाची आकडेवारी बघता प्रथमदर्शनी वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा भाजपला म्हणजेच मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना होणार असल्याचे दिसते आहे.

कसबा विधानसभा मतदार संघामध्ये 59.24 टक्के मतदान झाले आहे. 2019 मध्ये झालेल्या एकूण मतदानापेक्षा केवळ 2600 मतांची वाढ या मतदार संघांमध्ये झाली आहे. या मतदार संघात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार झाले. तोच ‘धंगेकर पॅटर्न’ चालणार का? अशाही चर्चा झडत आहेत. परंतु, त्या पोटनिवडणुकीमध्ये ‘मोदी फॅक्टर’ नव्हता. शिवाय ब्राह्मण समाजाची नाराजी होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून लोकसभा निवडणुकीचा (Pune Loksabha Election) अंदाज बांधने चुकीचे ठरेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचाही परिणाम येथील मतदानावर नक्कीच झाला आहे.

वडगावशेरीमध्ये 2019 च्या तुलनेत 35 हजार 636 मतांची वाढ झालेली आहे. सहा विधानसभा मतदार संघामध्ये ही सर्वाधिक वाढ आहे. भाजपने लावलेली ताकद, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे आणि मुरलीधर मोहोळांचा या मतदार संघात असलेला नातेवाईकांचा गोतावळा यामुळे या वाढीचा अथवा मतदानाचा फायदा मोहोळ यांनाच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे.

कोथरूड हा तर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदार संघामध्ये 2019 च्या तुलनेत सुमारे 17 हजार मतांनी वाढ झाली आहे. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर लागलेली वर्णी ही मोहोळांच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. कुलकर्णी यांनी लावलेला जोर आणि राज ठाकरे यांच्या सभेचा या मतदार संघावरही परिणाम झाला आहे. त्याचा फायदा हा मोहोळांनाच होणार आहे.

पर्वतीमध्ये 2019 च्या तुलनेत 5 हजार 704 मतांची वाढ झाली आहे. मागीलवेळी या मतदारसंघातून स्व. गिरिष बापट यांना मताधिक्य होतंच. यावेळीही आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ यांनी वस्त्यांमध्ये लावलेला जोर, भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी लावलेली ताकद, पर्वती भागात ब्राह्मण मतदार आणि मोठ्या प्रमाणात असलेला व्यापारी वर्ग यामुळे या मतदार संघातही मोहोळ यांनाच त्याचा फायदा होणार आहे. शिवाय भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक याच विधानसभा मतदारसंघात असल्याने संघटनात्मक मोठी ताकद मोहोळांना मिळाली. तसेच राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनीही सक्रीयपणे सहभाग घेतला होता.

शिवाजीनगरमध्ये 2019 च्या तुलनेत 1 हजार मतांची घट झाली आहे. तर कॅन्टोन्मेंटमध्ये 9 हजार 700 मतांची वाढ झाली आहे. याठिकाणी भाजपचे आमदार आहेत. येथे समसमान मते जरी गृहीत धरले तरी एकूण वाढ ही मोहोळांना फायद्याची ठरणार असल्याचे चित्र आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Eknath Shinde | चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही

Eknath Shinde | चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही

Next Post
Rakhi Sawant | राखी सावंतची प्रकृती बिघडली! हृदयविकाराने त्रस्त अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले

Rakhi Sawant | राखी सावंतची प्रकृती बिघडली! हृदयविकाराने त्रस्त अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले

Related Posts
uddhav thackeray

ठाकरे सरकारच्या विरोधात व्यापारी एकवटले, पुण्यात सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्यास विरोध

पुणे : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More
Anand Paranjape | लक्षद्वीपमध्ये 'घड्याळ' चिन्हावरच राष्ट्रवादी लढणार; चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये

Anand Paranjape | लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी लढणार; चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये

Anand Paranjape | लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत…
Read More
विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकवण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु - पवार

विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकवण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – पवार

मुंबई  – नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे,…
Read More