लाल महालातील नृत्य प्रकरणाचे भाजप नेत्याशी कनेक्शन ? राष्ट्रवादीच्या आरोपांमुळे खळबळ

पुणे – ज्या पवित्र वास्तुमध्ये जिजाऊ माँ साहेबांनी बालशिवबांना संस्काराचे धडे दिले,ज्या लालमहालात (Lal Mahal)  मिळालेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची (Hindavi Swarajy) स्थापना केली, त्या लाल महालात अशलाघ्य लावणीचे चित्रीकरण करणाऱ्या कुलदीप बापट, वैष्णवी पाटील,केदार अवसरे यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a crime) झालाच पाहिजे.तसेच त्यांना परवानगी (Permission) देणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहीजे,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP)  वतीने लाल महाल चौक येथे आंदोलन घेण्यात आले.

लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू (Historical architecture) असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, लालमहाल हि वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याच संबधितानी भान ठेवायला हवं होत. मात्र या वास्तूत एका सिनेमाचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.

हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यानी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी.खरं तर लालमहाल हि वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र या ठिकाणी कोणतही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायीक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसानी कडक कारवाई करावी.या चित्रीकरणासाठी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) एका लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून हे चित्रीकरण झाल्याचे समजते,स्वतः त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या स्वीय सहायकांना पाठवून चित्रीकरणासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर दबाव आणल्याचे समजते आहे. त्यामुळे संबंधितांवर देखील कठोर कार्यवाही व्हावी , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या वतीने करण्यात आली आहे.