Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्थांना ३१ जुलैपर्यंत हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे (Pune News) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीतील सर्व आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारक यांनी आतापर्यंत ८५७ प्रस्ताव दाखल केले आहेत. उर्वरित जाहिरात फलकधारकांनी परवानगीकरिता प्रस्ताव दाखल करावेत. विकास परवानगी विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावापैकी ४१० बोर्ड, बॅनर, फ्लेक्सधारक यांना त्रुटी पुर्ण करण्याकरिता कळविले असून त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात अन्यथा प्राधिकरणामार्फत निष्कासन करवाई करण्यात येईल.
प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत, धोकादायक आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स ३१ जुलैपर्यत स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा ते निष्कासित करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे पीएमआरडीए अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाचे सह आयुक्त अनिल दौंडे यांनी कळविले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :