Pune News | शुद्ध शाकाहारी पुणेकराच्या पनीर बिर्याणीत सापडले चिकनचे तुकडे, तरुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या!

Pune News | बाहेरचे अन्न खायला अत्यंत अस्वच्छ असते. बऱ्याचदा बाहेरील जेवणात अळ्या, झुरळे, मेलेला उंदीर निघाल्याची वृत्ते आपण ऐकली आहेत. मात्र आता पुण्यातील एका शुद्ध शाकाहारी (Pure vegetarian) व्यक्तीच्या जेवणात मांस सापडल्याचा धक्कादाय़क प्रकार घडला आहे.

पुण्यातील (Pune News) कर्वे नगरयेथील पीके बिर्याणी हाऊसमधून पंकज शुक्ला यांनी पनीर बिर्याणी मागवली होती. त्यात थेट चिकनचे तुकडे सापडले. हे तुकडे पाहून शाकाहारी पुणेकर असलेला शुक्ला नावाचा तरुण संतापला आणि त्याने झोमॅटोकडे तक्रार केली त्यानंतर त्या रिफंड मिळाले आहेत मात्र त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचं त्याने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याने झोमॅटोकडे तक्रार दिली आहे. त्यावर झोमॅटोनेदेखील स्पष्टीकरण दिलं आहे.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपल्या अधिकृत कस्टमर केअर अकाऊंटद्वारे शुक्ला यांच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला आणि आम्हाला कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही आणि तसा आमचा हेतूदेखील नाही. ग्राहक हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य आहे. तुम्ही तुमचा आयडी आणि फोन नंबर पाठवा आम्ही या संदर्भातील सगळी तपासणी करु, असं उत्तर झोमॅटोकडून देण्यात आलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप