Pune News | पालखी सोहोळ्याच्या आगमनावेळी स्पीकरच्या भिंती उभ्या करण्यास मनाई

Pune News | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहोळ्याच्या आगमनावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावण्यास किंवा स्पीकरच्या भिंती उभ्या करण्यास जिल्हा प्रशासनानं मनाई केली आहे. वारकरी महामंडळानं ही मागणी केली होती.

दरवर्षी आळंदी आणि देहूतून पंढरपूरकडे (Pune News) जाणाऱ्या पालखी सोहोळ्याचं स्वागत स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष, गणेश मंडळं, स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून केलं जातं; मात्र यावेळी परिसरात मोठ्या आवाजात ध्वनीवर्धक लावून त्यावर अभंगांसह विविध गाणी लावली जातात. वारकऱ्यांना या गाण्यांचा उपद्रव होत असल्याच्या अनेक तक्रारी वारकरी महामंडळाकडं आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ध्वनीवर्धकांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची मागणी वारकरी महामंडळानं जिल्हा प्रशासनाकडं केली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप