PMPL बस चालक आणि दुचाकीस्वारामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल

पुणे| ‘पुणे तिथे काय उणे’ हा वाक्यप्रचार महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. पुण्यात बऱ्याचदा अतरंगी घटना घडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात एका प्रवाशाने बस थांबवण्यासाठी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्या प्रवाशाचा स्टॉप निघून गेल्याने त्याने पीएमपीएमएल बस चालकाकडे पुढे बस थांबवण्याचा आग्रह केला. परंतु बस चालकाने नकार दिल्याने प्रवाशाने बराच वेळ आरडाओरडा करून गोंधळ घातला होता.

यानंतर आता पुणे स्टेशन (Pune Station) परिसरात पीएमपीएल बस चालक (PMPL Bus Driver) आणि दुचाकीस्वारामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ (PMPL Bus Driver Beat Biker) पुढे आला आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याचे समजत आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

व्हिडिओत दिसते की, दुचाकीस्वार आपली चप्पल हातात घेऊन बस चालकाच्या दिशेने येतो. हे पाहून संतापलेला बस चालकही बसमधून खाली उतरतो आणि दुचाकी चालकाला मारू लागतो. दोघेही एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी करतात. तेवढ्यात मागून त्या दुचाकीस्वाराच्या मदतीला एक व्यक्ती येतो आणि तो बस चालकाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून बसमध्ये बसलेला बस चालकाचा मित्र खाली उतरतो आणि त्या व्यक्तीला मारायला लागतो. या चौघांमधील वाढती मारामारी पाहून जवळील लोक मध्यस्थी करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसापूर्वीचं पीएमपीएल चालक आणि प्रवाशाची देखील याचं प्रकारची हाणामारीची बातमी पुढे आली होती. यानंतर पीएमपीएलमध्ये नेमक चाल्लय तरी काय असा प्रश्न आता पुणेकरांना पडण्याची वेळ आली आहे.