पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (Pune Crime News) केला आहे. दिल्ली, गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन असलेल्या या प्रकरणात, तब्बल 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने पद्मावती भागात गस्त घालत असताना एका व्यक्तीला अडवले. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा बंडल सापडला. तपासात त्या व्यक्तीने शाहीद कुरेशी, सैफान पटेल आणि अफजल शहा यांच्याकडून बनावट नोटा घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी नंतर नीलेश वीरकर आणि शाहीद जक्की कुरेशी यांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले. पुढील चौकशीत, शाहफहड अन्सारीनेही बनावट नोटा पुरवल्याची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणात (Pune Crime News) पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा दिल्ली आणि गाझियाबाद येथून आणल्या गेल्या होत्या. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास सुरू आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party
हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार
फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai