राज्यसेवा पुर्व परीक्षा पेपरफुटीच्या विरोधात अभाविपतर्फे पुंगी बजाओ आंदोलन

पुणे – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परीक्षांचा असंख्य गोंधळ चालला असून गेली महाडा पेपर फुटी आरोग्य भरती पेपर फुटी अचानक पेपर रद्द होणे अशा अनेक विषयांनी विद्यार्थी त्रस्त आहेत. यातच काल महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचा नागपूर येथील पूर्व परीक्षेचा पेपर फुटला असा दावा अभाविपने केला आहे.

दरम्यान, अनेकदा अशा प्रकारची पेपर फुटी होऊनही सरकार अजून गप्प आहे या विरोधात सरकार कोणतेही पाऊल उचलत नसून मुख्यमंत्री सुद्धा यावर काही बोलायला तयार नाहीत सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डेक्कन येथील गुडलक पुंगी बजाव आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विद्यार्थी वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे विद्यार्थी हिताचे कोणतेच निर्णय घेत नाही सरकार आढळत नाही माननीय शिक्षण मंत्री व सरकारी अधिकारी पैशांची अफरातफरी करण्यामध्ये व्यस्त आहे परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यास सरकारकडे कोणताच वेळ नाही नसल्याचे यावेळी अभाविपने म्हटले आहे.

“परीक्षांच्या या पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये सुपे सारखे अनेक अधिकारी सहभागी आहेत सरकारचा यावर काहीच वचक राहिलेला नसून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली, अन्यथा अभाविप आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने राज्यभर करेल,” असे प्रदेश सहमंत्रीअनिल ठोंबरे यांनी सांगितले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगर मंत्री शुभंकर बाचल, सहमंत्री अमोल देशपांडे,कोथरूड भागसंयोजक शांभवी साले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.