पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने ( ECI) पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, राज्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते.

काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची आयोगाला विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

16 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती समुदायातील अनेक लोक वाराणसीला जाण्याची शक्यता असल्याने ही विनंती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले . जारी केलेल्या निवेदनानुसारमी, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी आहे, तर उमेदवार 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतात. या निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर केला जाईल.