पंजाब, राजस्थानेन करून दाखवलं तुम्ही कधी करणार?, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात, केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

आगरा येथील शिवाजी महाराजांचे स्मारक तरुणाईला प्रेरक ठरेल !

Next Post

अब तक 56 चित्रपटात धमाकेदार भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा;

Related Posts
राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे; वळसे पाटलांचा दावा

राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे; वळसे पाटलांचा दावा

जळगाव –  राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या…
Read More
पुण्यात महायुतीचा डंका; महाविकास आघाडीचा धुव्वा

पुण्यात महायुतीचा डंका; महाविकास आघाडीचा धुव्वा

Maharashtra Assembly Election Results 2024 |  राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून भारतीय जनता पार्टी…
Read More
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? दिल्लीतील गाठीभेटीनंतर चर्चांना उधाण

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? दिल्लीतील गाठीभेटीनंतर चर्चांना उधाण

शिवसेना-उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची भेट घेतली. दिल्ली दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री…
Read More