दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नारायण राणे यांचा हल्लाबोल

दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नारायण राणे यांचा हल्लाबोल

Narayan Rane | महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दूरध्वनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा केले होते, असा दावा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ खासदार नारायण राणे ( Narayan Rane) यांनी शनिवारी केला.

आता दिशाच्या वडिलांवर दबाव नसल्याने त्यांनी न्यायासाठी कोर्टाकडे धाव घेतली असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही असा सवालही खा. राणे यांनी यावेळी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी खा. राणे म्हणाले की तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या वडिलांवर दबाव टाकला होता. या दबावामुळेच त्यांना त्यावेळी तशी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा कर्ता करविता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे होता, असा आरोपही श्री. राणे यांनी केला. सरकारने आता नव्याने एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी ही त्यांनी केली.

दिशाच्या वडिलांनीच कर्तव्यात कसूर करणा-या पोलिस अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे सांगत खा.राणे म्हणाले की पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना त्यावेळी केलेल्या दिरंगाई बद्दल जाब विचारावा आणि दोषी अधिका-यांना निलंबित करावे. दिशा सालियानला न्याय मिळायलाच हवा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी, असेही खा. राणे यांनी नमूद केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

आमदार सुरेश धस अडचणीत; राजीनाम्यासह नार्को टेस्टची मागणी

उन्हाळी सुट्टीत एसटीचा थंडगार प्रवास, राज्यभर 872 शिवशाही बसेस धावणार

पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार; पुणे महापालिकेचा इशारा

Previous Post
केंद्र सरकारचा निर्णय : कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द

केंद्र सरकारचा निर्णय : कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द

Next Post
आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली

आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली

Related Posts
Ajit Pawar | अजित पवारांनी ओबीसीचे वाटोळं केलं - हेमंत पाटील

Ajit Pawar | अजित पवारांनी ओबीसीचे वाटोळं केलं – हेमंत पाटील

Ajit Pawar : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला डावलण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) करत आहेत. राज्यातील…
Read More

राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी…
Read More

‘आत्मविश्वासाला धक्का लागला की…’, ज्योतिष भेटीवरून शरद पवारांचा एकनाथ शिंदेना चिमटा

शिर्डी (अहमदनगर): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचं (Shirdi…
Read More