व्वा रे लेका! आर माधवनच्या मुलाने उंचावली बापाची मान, खेलो इंडिया युथ गेम्समध्ये जिंकले ७ मेडल्स

अभिनेता आर माधवनचा मुलगा (R Madhavan Son) वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये सात पदके जिंकून आपल्या वडिलांचे नाव उंचावले आहे. आपल्या मुलाच्या या महान कामगिरीचा आर माधव यांना नक्कीच अभिमान वाटतो आहे. त्यांनी  ट्विटद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. वेदांतने मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games 2023) पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकली (R Madhavan Son Won Medals) आहेत.

माधवनने आपल्या मुलाचे आणि त्याच्या टीमचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ट्रॉफी आणि पदकांसह आपल्या मुलाचा फोटो शेअर करत माधवनने ट्विटमध्ये लिहिले की, “देवाच्या कृपेने १०० मीटरमध्ये सुवर्ण, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्ण आणि ४०० मीटर आणि ८०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले.”

माधवनने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, “अपेक्षा फर्नांडिस (६ सुवर्ण आणि १ रौप्य) आणि वेदांत माधवन (५ सुवर्ण आणि २ रौप्य) यांच्या कामगिरीने खूप कृतज्ञ आणि नम्र वाटत आहे.” खेलो इंडियाच्या आयोजनाबद्दल माधवनने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचेही आभार मानले आहेत.

वेदांतने यापूर्वी अनेक पदके जिंकली आहेत
दरम्यान माधवनचा मुलगा वेदांत हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे. याआधीही त्याने अनेकवेळा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले नाव गाजवले आहे. आर माधवन नेहमीच आपल्या मुलाच्या विजयावर ट्विट करून आनंद व्यक्त करत आहे. २०२१मध्ये, माधवन ऑलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी पत्नीसह दुबईला शिफ्ट झाला, जेणेकरून वेदांतचे प्रशिक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.