शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी रस्सीखेच; संजय कोकाटे,महेश चिवटे,सचिन बागल यांची नावे चर्चेत

करमाळा –  सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे(shivsena district chief Dhanjay Dikole)यांच्या बाबत वाढलेला तक्रारीचा सूर याबाबत सेना भवनला(Senabhavan) झालेली खलबते करमाळा(Karmala) व माढा(Madha) या दोन्ही तालुक्यातून धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाला जाहीरपणे होत असलेला विरोध हे पाहता येणाऱ्या काळात लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी बदलाचे संकेत मिळत आहेत.  जिल्हा प्रमुख पदासाठी टेंभुर्णी येथील 2019 चाली शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढलेले संजय कोकाटे(Sanjay kokate),  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे(deputy chief mahesh chivate), युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल(yuvaseba district cheif sachin bagal) यांची नावे चर्चेत असून या तिघांपैकी कोणालातरी जिल्हा प्रमुख पदाची संधी मिळेल असे शिवसेनेच्या गोटातून चर्चा आहे.

येत्या आठवड्यात सेनाभवन मधून पक्षांची परिस्थिती तपासण्यासाठी पक्षनिरीक्षक येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.धनंजय डिकोळे यांनी जिल्हाप्रमुख या पदाच्या काळात  पक्ष संघटनेसाठी कोणतेही काम केले नाही केवळ आमदार बबनदादा शिंदे(Mla Baban shinde) व संजय मामा शिंदे(Mla Sanjay Shinde) यांचे हस्तक म्हणून काम करतात असा आरोप होतं आहे. याबाबतचे शिवसैनिकांनी शिवसेना सचिव अनिल देसाई(Anil desai) यांच्यासमोर करून काही पुरावे दाखल केले होते

नुकत्याच झालेल्या सोलापूर(Solapur) येथील युवासेनेच्या बैठकीत सुद्धा झालेल्या वादाची ठिणगी संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेतील पदाधिकारी बदला असा सूर उमटू लागली आहे. येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद(zilla parishad) पंचायत समिती(Panchayat samity) नगरपालिका निवडणूक पाहता नवीन चेहऱ्यांना पदावर काम करण्याची संधी देण्याची मानसिकता वरिष्ठ नेते मंडळींची झाली आहे. सोलापूर संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत(Tanaji sawant) यांना हटवले शिवाय आम्ही काम करणार नाही अशी भूमिका बहुतांश पदाधिकाऱ्यांनी  घेतल्यामुळे गेली दोन वर्षांपासून शिवसेनेचे संघटन जिल्ह्यात मोडकळीस आले  आहे.

तर दुसऱ्या बाजूने संपर्कप्रमुख  सावंत यांनी काम करणारे निष्ठावान पदाधिकारीसोबत असतील तरच शिवसेना वाढू शकते पदावर राहून जर विरोधकांशी हातमिळवणी करणारे पदाधिकारी असतील तर शिवसेना वाढणार कशी असा प्रश्न आमदार तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब(chief ministerUddhav thackeray) यांच्या पुढे मांडला असून संपर्कप्रमुख विद्यमान पदाधिकारी यांचा वाद शिगेला गेला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठेने काम केले असून वैद्यकीय कक्ष(mediacl) च्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत केली.  अनेक आंदोलने मोर्चा त्यांचा सहभाग असून शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे(urban devlopment minister Eknath shinde) यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे त्यांना यावेळी संधी मिळेल अशी चर्चा आहे.

धनंजय डिकोळे यांना तालुक्यातच शह देण्यासाठी माढा तालुक्यातील सचिन बागल यांना जिल्हा प्रमुख पद देण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. माढा विधानसभा निवडणुकीत 77 हजार मते घेतलेले संजय बाबा कोकाटे(sanjay baba kokate) सुद्धा जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत.  यामुळे माढा विभागाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदी महेश चिवटे संजय कोकाटे व सचिन बागल या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार का यापेक्षाही दुसऱ्या चेहऱ्याला संधी मिळणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.