पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो बॉय रईस शेखने घेतला तरुणीचा किस, पुण्यातली खळबळजनक घटना

पुणे – पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका 19 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने किस (Kiss) घेतल्याची संतापजनक घटना पुण्यातील येवलेवाडीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलीस (Kondhava Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केले आहे. रईस शेख असे अटक करण्यात आलेल्या 40 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी घरात एकटी होती, त्यावेळी डिलिव्हरी बॉयनं तिचं जबरदस्तीने चुंबन घेतल्याचे समजते. तरुणीने तत्काळ याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. फिर्यादी तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने झोमॅटो अॅपवरुन जेवण मागवले होते. जेवणाचे पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री 9:30 वाजताच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता.(Raees Shaikh, the Zomato boy who brought the parcel, kissed the girl)

पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. ज्या तरूणीचा विनयभंग झाला ती एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला आहे. कामावरून घरी परतल्यानंतर तिने झोमॅटोवरून जेवण मागावलं होतं. जेवणाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या बॉयने ही तरूणी एकटी असल्याचं पाहून तिचा विनयभंग केला.