राहुल द्रविडच्या नावावर आहेत ‘हे’ मोठे पाच विक्रम जे मोडणे केवळ अशक्य आहे

Rahul Dravid :  टीम इंडियाचे (Team India) सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे जगभरात चाहते आहेत. राहुल द्रविड यांच्या नावावर 5 मोठे रेकॉर्ड आहेत.आज आपण द्रविडचे असे पाच विक्रम पाहूया, जे आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने मोडलेले नाहीत.

कसोटी क्रिकेटमध्ये (Test cricket) सर्व संघांविरुद्ध शतके झळकावणारा राहुल द्रविड हा एकमेव फलंदाज आहे. याशिवाय तो एकमेव फलंदाज आहे ज्याने 31, 258 चेंडूंचा सामना केला आहे. कोणत्याही फलंदाजासाठी हा विक्रम मोडणे फार कठीण आहे. द्रविडच्या नावावरही भागीदारीचा मोठा विक्रम आहे. दोनदा 300 हून अधिक धावांची भागीदारी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

राहुल द्रविडच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक झेल घेणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये 200 झेल घेतले आहेत.