हद्द झाली : तेलंगणात शेतकरी रॅलीसाठी गेलेल्या राहुल गांधींना काय बोलायचं हेच माहित नव्हतं ?

नवी दिल्ली : नेपाळ मधील एका व्हिडीओमुळे कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) चर्चेत अआले असताना आता भाजपकडून (BJP) आणखी एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय (BJP leader Amit Malviya) यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हा व्हिडीओ तेलंगणात शेतकरी रॅली (Farmers Rally) सुरू होण्याआधीचा आहे. यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला काय बोलायच आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच ‘जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली (Foreign trip) आणि नाईट क्लबिंगच्या मध्ये राजकारण करता तेव्हा असं होतं’, असा टोलाही मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे. याआधीही मालवीय यांनी राहुल गांधीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ते नेपाळच्या एका नाईटक्लबमध्ये (Nightclub) दिसून आले होते. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या व्हिडीओवरून राहुल गांधीवर भाजपाने टीकास्त्र सोडले होते.