चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! राहुल कलाटे करणार बंडखोरी

Rahul kalate : चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Nana Kate has been nominated by NCP in Chinchwad by-election.). राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अश्विनी जगताप विरूद्ध नाना काटे असा सामना होणार असं वाटत असताना आता या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केले आहे. कलाटे यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेकडून तर 2019 ची विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक असलेले कलाटे यांच्याकडे पिंपरी चिंचवड मधील शिवसेनेचे गटनेतेपद आहे. कलाटे यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने नाना काटे यांच्या अडचणी वाढू शकतात.

राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष आणि दुसऱ्याच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला होता. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ठिक नाही तर त्यांनी स्वत:साठी दुसरा पर्याय म्हणजेच अपक्ष उमेदवाराचा पर्याय राखून ठेवला होता. त्यांच्या या खेळीचा त्यांना फायदा झाला.