उस्मानाबाद येथील  गोवंश मांस कत्लखान्यावर छापा; ३ टेम्पोसह २६, ७७,५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 

तुळजापूर – उस्मानाबाद शहरातील खिरणीमळा येथे अनाधिकृतरीत्या प्राण्याची कत्तल होत असल्याची गोपनीय मिळाल्यावर पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने सहा पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब एम. रमेश यांनी दोन पथके तयार करुन छापा मारला असता ताजे मांस,कातडे, वाळलेले मांस, वाहतुक करणारे तीन टेम्पो आढळून आले. पोलीसांनी ३ टेम्पो, मांस व तीन जिवंत जनावरे असा एकुण २६, ७७,५०० ₹ मुद्देमाल जप्त केला.सदरील कारवाई शुक्रवार दि १६ रोजी  करण्यात आली.

या बाबतीत अधिकमाहीती अशी की उस्मानाबाद शहरातील फकीराचौकाजवळ वैराग रोडवर एक आयशर टेम्पो वाहन चालकासह धरुन टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पो मध्ये गोवंश मांस आढळून आले. टेम्पो मधील मांस कोठून आणले असे विचारले असता जलील कुरैशी यांच्या कत्लखान्यातील असल्याचे सागितले.

टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग ळळंब सोबत उपविभाग कळंब,एम. रमेश येथील दोन्ही पथक, पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथील RCP] QRT पथक व पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोनि उस्मान शेख व पोलीस स्टाफ सह दि. १६.०२.२०२३ रोजी १७.०० वा. सु. खिरणीमळा खाटीक गल्ली येथील कत्तलखान्यात छापा मारला असता तेथे कापण्यासाठी लागणारे साहित्य व बाजूस असलेल्या वाहनामध्ये मांस असे आढळून आले.

या कारवाईत एकुण ३ टेम्पो- १९,००,००० ₹ गोवंश मांस – ७, ५७,५००₹, ३ जिवंत गांवंशी जनावरे २०,००० ₹असे एकुण २६, ७७,५००₹ रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. व ०३ आरोपी विरुध्द कलम २७९, २८३, १८८ भा.द.सं सह कलम ५ क ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब सोबत उपविभाग कळंब एम. रमेश, उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- उस्मान शेख, सपेनि- काबंळे, पठाण, चव्हाण पोउपनि पुजरवाड, चाटे, पोलीस ठाणे स्टाफसह यांनी केली आहे.