राज गर्जना : राज ठाकरेंच्या पुढील सभेची वेळ आणि तारीख ठरली

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ठाण्यातील सभेसाठीचं परवानगी नाट्य अखेर संपलं आहे आणि या सभेचा दिवस पोलिसांच्या परवानगीसह निश्चित झाला आहे. ठाण्यामधील मनसेची ९ एप्रिल रोजी होणारी सभा रद्द झाली असून ती आता १२ एप्रिल रोजी होणार आहे.

९ एप्रिल रोजी ठाण्यात मोकळ्या जागेवर राज ठाकरे यांच्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकरली होती. रस्त्यावर वाहतूक समस्या निर्माण होण्याचं कारण देण्यात आलं होतं. शिवाय, इतर कोणत्याही सभागृहात सभा घेण्याची सूचना पोलिसांकडून मनसेला करण्यात आली होती. परंतु परवानगी नाकारल्यानतंरही गडकरी रंगायतन (Gadkari Rangayatan) बाहेर सभा घेण्यावर मनसे ठाम होती.

दरम्यान, आता १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसलेली जी उत्तर सभा आहे, ती तलाव पाळीला गडकरी रंगायतनच्या दुसऱ्या रस्त्यावर ही होणार आहे आणि ही पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे.” अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panase) यांना पत्रकार परिषदेत दिली.