राज ठाकरे झाले आजोबा! अमित आणि मिताली यांना पुत्ररत्न प्राप्ती

मुंबई –मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परिवारासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackrey)यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackrey)आणि सून मिताली ठाकरे (Mitali Thackrey) यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. याच नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत. या निमित्ताने आता ठाकरे परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.