मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट

मुंबई – आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणरे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (Union Minister and BJP leader Narayan Rane) रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

दरम्यान, आज रंगशारदामधील कार्यक्रम आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नारायण राणेंची भेट घेण्यासाठी थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते नारायण राणे यांना भेटण्यासाठी जात आहेत. नारायणा राणे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे राणे कुटुंबिय आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.