एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वतःच कर्तृत्व समजू लागतो, तेव्हा …;मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 च्या निवडणुकीवेळी म्हणाले अन् हा डायलॉग त्यांच्या नावासोबत कायमचा जोडला गेला. काहीवेळा हा डायलॉग त्यांच्या प्रगतीचं प्रतीक बनला तर कधी त्यांना याच डायलॉगवरून हिणवलं गेलं. पण त्यांचा हा डायलॉग सध्या खरा ठरताना दिसतोय. कारण राज्यात पुन्हा फडणवीस सरकार अस्तित्वात येईल अन् देवेंद्र पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी बसतील.

दरम्यान, या घडामोडींवर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. अत्यंत मोजक्या शब्दात त्यांनी चालू घडामोडींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो. असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.