राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, लवकरच सभेचे ठिकाण व तारीख जाहीर करणार

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द ( Raj Thackeray Pune Sabha Canceled ) झाली आहे. अशा आशयाचे पत्र पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंची सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे स्वतः उद्या गुरूवारी स्पष्टीकरण देतील. पण पुण्यातली सभा होणारच अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार असून सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचंही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.