तुम्ही जशास दुप्पट उत्तर दिलंत, राज ठाकरेंची मनसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप

तुम्ही जशास दुप्पट उत्तर दिलंत, राज ठाकरेंची मनसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यावर सुपारी हल्ला झाल्यानंतर, शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर नारळ आणि शेण फेकले. शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी आणि टोमॅटोने हल्ला झाल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला. मनसेच्या या राड्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले असतानाच आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. तुम्ही जशास तसं नव्हे तर जशास दुप्पट प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती.

माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता.

ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.

बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं.

मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली. मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.

माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे.

आणि लोकं हे पण म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, तुम्ही गुद्दे पण देताच की… हो आम्ही देतो गुद्दे….

महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.

फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’ उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे. महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. म

हाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू. यांत काही मोजके पत्रकार, त्यांच्या हातातील वर्तमानपत्र असो की एखादं चॅनेल, याचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरायचं सोडून, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहेत हे उघड झालं. समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही.

मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे आणि त्यातून जो वणवा पेटतोय त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका. जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा.

आपला राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

Raj Thackeray | उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही, राज ठाकरेंचा उद्धव आणि शरद पवारांना इशारा

Raj Thackeray | संजय राऊत हे शरद पवारांच्या अमंगल कार्यातील करवली; राज ठाकरे यांची खोचक टीका

Uddhav Thackeray | अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ताची उबाठाने दिल्लीत घेतली भेट

Previous Post
पुण्याच्या गणेशोत्सवात लोकसहभाग वाढविणे गरजेचे - केंद्रीय मंत्री Murlidhar Mohol

पुण्याच्या गणेशोत्सवात लोकसहभाग वाढविणे गरजेचे – केंद्रीय मंत्री Murlidhar Mohol

Next Post
Hindenberg Report : हिंडनबर्गच्या नवीन अहवालानंतरचा पहिला ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार पडू शकतो - सर्वांच्या नजरा

Hindenberg Report : हिंडनबर्गच्या नवीन अहवालानंतरचा पहिला ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार पडू शकतो – सर्वांच्या नजरा

Related Posts
IPL 2024 Playoffs Schedule | धोनीच्या स्वप्नांचा चुराडा, तर कोहलीच्या ट्रॉफीच्या अपेक्षा उंचावल्या; पाहा प्लेऑफचे वेळापत्रक

IPL 2024 Playoffs Schedule | धोनीच्या स्वप्नांचा चुराडा, तर कोहलीच्या ट्रॉफीच्या अपेक्षा उंचावल्या; पाहा प्लेऑफचे वेळापत्रक

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने क्रिकेट जगताला चकित केले आणि आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये (IPL 2024 Playoffs Schedule) आपले स्थान…
Read More

ओम फट स्वाहा.. हार्दिकने चेंडूला पकडून मंत्र म्हटला अन् पाकिस्तानी फलंदाज झटक्यात आऊट झाला!

Hardik Pandya: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात शानदार सामना…
Read More
मनोहर भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही? अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल

मनोहर भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही? अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल

मुंबई : मनोहर भिडे (Manohar Bhide) पोलीस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत…
Read More