राज ठाकरेंनी केलं नुपूर शर्मांचं समर्थन; झाकीर नाईकचा उल्लेख करत म्हणाले,….

Mumbai –  एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे.हिप बोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर बराच काळ राज ठाकरे सार्वजनिक आयुष्यापासून लांब होते. बऱ्याच काळानंतर आज राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात चौफेर टोलेबाजी केली.

त्या नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. मी बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं ते (बोलत होत्या)”, असं म्हणत राज यांनी नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तसेच पुढे राज यांनी भारतामधून फरार झालेला मुस्लिम धर्मोपदेशक आणि इस्लामिक रीसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकचा उल्लेख केला.“तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमान आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती,” असंही राज भाषणामध्ये म्हणाले.

“झाकीर नाईकच्या बाबतीत काही नाही झालं त्याच्याबद्दल कोण काही बोललं नाही. त्याला कोणी सांगितलं नाही माफी मागा. ते बोलणं सोडून दिलं तुम्ही,” असं म्हणत राज यांनी नाराजी व्यक्त केली.