राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार ?, राजेश टोपे यांचे मोठे विधान

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना (Corona) व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन (Omicron Variant) असं नाव दिलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील या विषाणू बद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र अस असलं तरी देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.

हे देखील पहा