उद्धव ठाकरे गटातून गळती सुरूच; मातब्बर नेता करणार भाजपमध्ये प्रवेश 

Amaravati – सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहेत. एकीकडे खरी शिवसेना कुणाची यावर सुप्रीम कोर्टात वाद सुरू असतानाचा ठाकरेंना अमरावतीमध्ये मोठा झटका बसला आहे. अमरावतीचे जिल्हाप्रुमख राजेश वानखेडे (Rajesh Wankhede) आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

आज  नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजेश वानखडे यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

वानखेडे हे अमरावतीतील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिकही भाजपमध्ये जाणार असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.